मुंबई - आई प्रत्येकाला विचारतेय लेकीबद्दल...चपल घ्यायला गेली अन् अडकली
मुंबई - इमारतीत पार्किंग मध्ये लागलेल्या आगीत अनेक कुटुंबे जळून खाक झाली. या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एकूण आठ कुटुंब राहतात. पार्किंग मध्ये मीटरचा स्फोट झाल्याने पहिला ते सात मजले आगीच्या धुरात दिसेनासे झाले.
पहिल्या मजल्यावर राहणारी १८ वर्षीय तिशा चौगुले हिची परीक्षा सुरू होती. काल रात्री ती अभ्यासाची तयारी करत होती. आग लागली तेव्हा कुटुंब सर्व खाली पळाले. पण, तिशा पुन्हा घरी चपल घ्यायला गेली. तिच्या कुटुंबाला वाटले की ती खाली आली पण ती चुकून दुसर्या घरी शिरली.
जिथे धूर पसरला होता. ती तिथेच पडली आणि बेशुद्ध झाली. त्यातच तिचा जीव गेला. तिशाला रील्स बनवण्याची आवड होती. अभ्यासात हुशार आणि घरात सर्वांची आवडती तिशा एका रात्रीत तिच्या कुटुंबाला सोडून गेली. तिशाच्या मृत्यूची बातमी अद्याप तिच्या आईला दिली नाही. कारण त्यांना ही सध्या रुग्णालयात दाखल केले आहे.
तिशाची आई संजना चौगुले येणार्या प्रत्येकाला तिशाबद्दल विचारात असल्याचे तिचे वडील संजय यांनी सांगितले. या सहसंजय यांची आई आक्का ताई ही सध्या रुग्णालयात दाखल आहेत.
तळमजला, पहिला आणि दुसर्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास झाला असून धुरामुळे अनेकांना पालिकेच्या जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. रात्री 1.30 च्या सुमारास आग लागल्याने नागरिकांची धावपळ झाली. यामध्ये सात जण ठार झाले तर ५० जखमी आहेत.