[ICC विश्वचषक 2023] भारत किती कमावतो हे तुम्हाला माहिती आहे का ? तब्बल 13 हजार कोटी रूपये

 ICC विश्वचषक 2023

[ICC विश्वचषक 2023] भारत किती कमावतो हे तुम्हाला माहिती आहे का ? तब्बल 13 हजार कोटी रूपये
भारत किती कमावतो हे तुम्हाला माहिती आहे का?

ICC World Cup 2023 : भारत कमवणार तब्बल 13 हजार कोटी रूपये; इतरांच्या तुलनेत तीन पट जास्त होणार कमाई?


भारतात होणारा 13 वनडे वर्ल्डकप हा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यंदा वर्ल्डकप भारतात होत असल्याने भारतीय संघाला होम कंडिशनमध्ये खेळण्याचा फायदा होईल. त्यामुळे त्यांच्याकडून विजेतेपदाची अपेक्षा केली जात आहे.

मात्र भारतात वर्ल्डकप होण्याने फक्त भारतीय संघालाच नाही तर संपूर्ण भारतालाच फायदा होणार आहे. हा फायदा आर्थिक आहे. आयसीसीने वर्ल्डकपच्या कालावधीत आयोजन करणाऱ्या देशांना किती कोटींचा फायदा झाला आहे याची यादी जाहीर केली.


वर्ल्डकपची सुरूवात ही 5 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्या सामन्याने होणार आहे. याच मैदानावर भारत - पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. वर्ल्डकपसाठी सर्व संघ भारतात दाखल झाले असून ते पुढचे 45 दिवस वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्यासाठी जीवाचं रान करतील.


आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार 2015 च्या वर्ल्डकपचे संयुक्तरित्या आयोजन करणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला 2887 कोटींचा फायदा झाला होता. तर 2019 मध्ये इंग्लंडला 3727 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. मात्र भारताला चार वर्षानंतर येणाऱ्या वर्ल्डकपदरम्यान 13,318 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे.


इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय अर्थव्यवस्थेला जवळपास 13,318 कोटींचा फायदा होणार आहे. याचबरोबर आयसीसीने नुकतेच वर्ल्डकपसाठीची बक्षीस रक्कम देखील जाहीर केली.


यानुसार विजेत्या संघाला जवळपास 40,00,000 डॉलर मिळणार आहेत. तर उपविजेत्याला जवळपास 20,00,000 डॉलर रूपये मिळणार आहेत. तर दोन सेमी फायनल खेळणाऱ्या संघांना 8,00,000 डॉलर मिळणार आहेत. तर ग्रुप स्टेजमधील संघांना 1,00,000 डॉलर रूपये मिळणार आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post
Put Your Advertisement Here